मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका

टीम महाराष्ट्र देशा – राज्याचे बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण साहेब यांनी जे विधान केले ते म्हणजे त्याच्या जे पोटांत होते ते ओठांत आले. भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी मुस्लिम समाजाचा आग्रह होता म्हणून आम्ही शिवसेना सोबत जाऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत म्हणजे शेतकरी हितासाठी नव्हे तर समाजा- समाजा मध्ये फूट पाडण्यासाठी आम्ही सत्तेत आलो आहोत असा अर्थ होतो अशी टीका रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी महाराष्ट्र देशाला प्रतिक्रिया देताना केली आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकार स्थापन होताना आपण सर्व जण म्हणत होतात शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येऊन सरकार स्थापन करत आहोत आता आपण शेतकरी हित धर्म विसरून गेलात कारण सर्व जाती धर्मात शेतकरी आहेत असेही शिंदे म्हणाले.

Loading...

पांडुरंग शिंदे पुढे म्हणाले, काँग्रेस पक्ष गेली ६० वर्षांपासून हिंदू-मुस्लिम अशा वाद निर्माण करून देशांवर आणि राज्यावर राज्य केले आहे हे यातून सिध्द होते. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व समाजाला घेऊन पुढे चाललेले आहेत. काश्मीर मधील बांधवांसाठी कलम ३७० आणि मुस्लिम भगिनीसाठी तिहरी तलाक कलम ३७७ सारखे ऐतिहासिक निर्णय घेऊन मुस्लिम समाजासाठी न्याय देत आहेत. माझे मुस्लिम बांधवांना विनंती आहे,नागरिक हक्क कायदा (CAA,NRC) ह्या बदल काही वाद असेल पण गेली ६० वर्षांपासून आपणास भीती दाखवून राज्य करत आहेत.यांच्या पासून सावध होणे गरजेचे आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण ?

महाराष्ट्रात आता आमचे सरकार आहे. भाजपचे संकट आणखी पाच वर्षे महाराष्ट्रावर नको म्हणून आम्ही या सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. भाजपला रोखायचे असेल तर काँग्रेसला महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी व्हावे लागेल, असे पक्षात सर्वांचे मत बनले. त्यातच अनेक मुस्लिम बांधवांनीही तसा आग्रह आमच्याकडे धरला. तो आग्रह मान्य करून आम्ही राज्यातील सरकारमध्ये सहभागी झालो. आता आमचे सरकार महाराष्ट्रात असल्याने तुम्हाला चिंता करण्याचे कारण नाही. हे सरकार असेपर्यंत महाराष्ट्रात सीएए लागू होणार नाही.

दरम्यान भाजपने यामुद्द्यावरून शिवसेनेवर निशाणा साधला. चव्हाणांच्या या विधानावर शिवसेना गप्प का आहे ?, असा खोचक सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. त्यामुळे हा वाद आता कोणतं वळण घेतो हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार