सुभाष देसाई यांच्या भेटीदरम्यान मंत्री अब्दुल सत्तार – दानवेंची उपस्थिती !

औरंगाबाद : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष यांनी पालकमंत्री देसाई यांच्या भेटी दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवेंची उपस्थिती खटकणारी होती. याचे कारण म्हणजे बँकेच्या अध्यक्ष तसेच उपाध्यक्षांच्या निवडीदरम्यान मंत्री संदीपान भूमरे तसेच अंबादास दानवेंनी वेगळी भूमिका घेतली होती.

त्यामुळे सत्तार यांनी दानवेंच्या वागणुकीबद्दल पक्ष शिस्त तसेच वरिष्ठांना या बाबत रिपार्ट करुन पाठवतो असे म्हटले होते. तर आता पुन्हा हे दोघे सोबतच दिसल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.निवडणुकीदरम्यान वेगळी तसेच टोकाची भूमिका घ्यायची आणि नंतर वेगळी भूमिका घ्यायची हे कोणते राजकारण हेच सर्वसामान्यांना पडलेला मोठा प्रश्न आहे. मंत्री संदीपान भूमरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी उपाध्यक्ष पदाबाबत वेगळी भूमिका घेवून संचालकपदासाठी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितला होता.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचीत संचालक कृष्णा पाटील डोणगावकर यांनी निवडणुकीदरम्यान उपाध्यक्ष पदाचा अर्ज देखील भरला होता. तर या वेळी अर्जुन गाडे पाटील यांना १३ मते पडली तर कृष्णा पाटील डोणगावकर यांना केवळ ७ मते पडले. त्यामुळे ते पराभूत झाले होते. या नंतर पत्रकारपरिषदेमध्ये सत्तार यांनी दानवे तसेच भूमरेंवर वेगवेगळे आरोप देखील केले होते. त्यामुळे आता मंत्री संदीपान भूमरे तसेच मंत्री अब्दुल सत्तार तसेच आमदार अंबादास दानवे हे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे घडले ते विसरले आहेत की काय ? असा सवाल सामान्य नागरिकांना पडत आहे.

महत्त्वाच्या बातम्या