‘मी पुन्हा येईन’, रावसाहेब दानवेंची जोरदार बॅटिंग

लातूर : राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानपरिषदेवर निवडून आलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी रावसाहेब दानवेंचा भावी मंत्री असा उल्लेख केला. याच पार्श्वभूमीवर दानवे भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी “मी पुन्हा येईन, पण पुढच्या वर्षी,’ असे प्रतिपादन केलं.

लातूरमधील कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या आमदाराने ‘भावी मंत्री’ असा उल्लेख केला असता, दानवे यांनी ‘मी पुन्हा येईन! पण पुढच्या वर्षी’ असं म्हणत जोरदार बॅटिंग केली. ते लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे बोलत होते.

Loading...

तसेच ‘लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यामध्ये आम्ही कधी चांगला परफॉर्मन्स देऊ शकलो नाही, तरी लोक आम्हाला निवडून देत आहेत, म्हणून नेमकी गुणवत्ता कशात असते, हे मला कधी कळले नाही, असेही दानवे यावेळी येथे बोलताना म्हणाले.

दरम्यान, ‘हाऊसमध्ये जो चांगला परफॉर्मन्स देतो, तो लोकांमधून निवडून येत नाही आणि जो चांगला परफॉर्मेन्स देत नाही, तो मात्र लोकांमधून निवडून येतो. असं का होतं, हे मला कळत नाही,’ असे देखील भाष्य रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
सावधान ! कोरोनाचे नवे केंद्र झोपडपट्टीत, अनेकजण सापडले कोरोनाबाधित
...त्यामुळे भारताला कोरोनापासून अमेरिके इतका धोका नाही, या तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले मत
‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
'नवे रुग्ण न आढळल्यास 'हे' राज्य '७ एप्रिल'पर्यंत कोरोनामुक्त होण्याची शक्यता'
महाराष्ट्रातील ‘या’ शहरात वाढला कोरोनाग्रस्तांचा झपाट्याने आकडा, सात महिन्यांच्या बाळाचाही समावेश
'धन्यवाद अजित पवार! शेवटी अनुभवाचं महत्व तुम्ही दाखवून दिलं; बाकीचे फेसबुक लाईव्हमध्ये व्यस्त'
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
#मरकज : मशीद खाली करण्यास मौलानांनी दिला नकार,  अजित डोवालांना उतरावं लागल मैदानात
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका