गोध्रा निवडणुकीत एमआयएमचा विक्रमी विजय, गुजरातमध्ये वाढली पक्षाची ताकद

अहमदाबाद : गुजरामध्ये झालेल्या पालिका निवडणुकींमध्ये भाजपने विक्रमी विजय मिळवला असला तरी ओवैसी यांच्या एआयएमआयएमने केलेला प्रवेश देखील धमाकेदार म्हणावा लागेल. विशेष म्हणजे गोध्रा मतदार संघात एमआयएमने आठ पैकी ७ जागांवर विजय मिळवला आहे.

गुजरात पालिका निवडणुकीचे निकाल येण्यास मंगळवारी सकाळपासूनच सुरूवात झाली होती. यात भारतीय जनता पक्षाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करत विक्रमी मताधिक्य मिळवले आहे. मात्र, भाजपबरोबरच आम आदमी पक्षानेही पंचायत आणि नगरपालिकांमध्ये चांगले यश मिळवले आहे. सौराष्ट्र, सूरत आणि साबरकांठामध्ये ‘आप’ने पंचायत समितीमध्ये सहा, तहसिलमध्ये १८ तर नगरपालिकेमध्ये २२ अशा एकूण ४६ मतदारसंघात विजय मिळवला आहे. ओवैसी यांच्या एमआयएमनेही ९ जागी विजय मिळवला आहे. मोडासा आणि भरूचमध्येही प्रत्येकी एका जागी एमआयएमने विजयी पतका फडकवला आहे.

हैदराबाद मनपा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्याच वेळी एमआयएमने गुजरात निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे जाहीर केले होते. भाजपला हैदराबाद निवडणुकीत फारसे हाती लागले नसले तरी गुजरातमध्ये एमआयएमने दमदार प्रवेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या