fbpx

विधानसभेला एमआयएम शंभर जागा लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी आता मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. युती आणि आघाडीत जागावाटपाच्या चर्चा सुरु आहेत. अशातच वंचितचा घटक पक्ष असलेल्या एमआयएमने १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकरांकडे केली आहे.

विधानसभेसाठी एमआयएमचे प्राबल्य वाढलेले आहे. त्यामुळे त्यांना जिंकण्याची आशा वाटतेय अशा शंभर जागांची यादी एमआयएमने तयार केली आहे. या जागांची यादीसुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती आहे. या विषयी प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांची लवकरच बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत एमआयएमने फक्त एक जागा लढवली होती आणि त्यात त्यांना विजय मिळाला होता. त्यामुळे आता एमआयएमने केलेली १०० जागांची मागणी प्रकाश आंबेडकर मान्य करतात का हे पाहणे महत्वाच ठरणार आहे.