राज ठाकरे म्हणजे ‘बुझा हुआ दिया’-वारीस पठाण

raj thackeray vs waris pathan

सोलापूर: मनसेची हिम्मत असेल तर त्यांनी येऊन तोडफोड करावी मग तुम्हाला दाखवतो म्हणत एमआयएम आमदार वारीस पठाण यांनी अनधिकृत फेरीवाला आंदोलनावरून मनसेवर निशाना साधला आहे. तसेच राज ठाकरे म्हणजे बुझा हुआ दिया असल्याची घणाघाती टीकाही पठाण यांनी केली आहे. सोलापुरमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पठाण यांनी मनसेवर कडाडून टिका केली आहे.

मनसे इतर भागात तोडफोड करते मात्र त्यांनी भायखळ्यात तोडफोड केली तर जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे , त्यामुळेच ते आमच्या भागात येत नाहीत. तसेच तोडफोड करणे म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मनसेची धडपड असल्याची टीकाही वारीस पठाण यांनी केली.