एमआयएमची धुळे-जळगाव मध्ये एंट्री

टीम महाराष्ट्र देशा – आज निकाल जाहीर झालेल्या धुळे महापालिकेत विजय मिळवत एमआयएमने उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात देखील प्रवेश मिळवला आहे. एमआयएमने जळगाव महापालिकेमध्ये ३ आणि आणि धुळे महापालिकेत २ जागा अश्या एकूण ५ जागा जिंकल्या आहेत. उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएम ची एंट्री आहे.

खासदार ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाने २०१२ साली नांदेड महापालिका निवडणुकीतून महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर लातूर, औरंगाबाद आणि मुंबई पालिकेसह एमआयएम पक्षाने विधानसभेत धडक मारली.

आता राज्यात भारिपसोबत युती करून एमआयएम आगामी निवडणुकांची तयारी करत आहे. येत्या काळात भारिप आणि एमआयएम युतीमुळे राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं तर आश्चर्य वाटणार नाही.