लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश 

लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश 

मुंबई  – लातूर जिल्हयातील उदगीर नगरपंचायतीमधील एमआयएमच्या नेत्यांसह  नगरसेवकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेल्या सर्व नगरसेवकांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात स्वागत केले.

एमआयएमचे लातूर जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सय्यद ताहीर हुसेन, नगरसेवक जरगर शमशोद्दीन, नगरसेवक शेख फयाज नसोरोद्दिन, नगरसेवक हाश्मी इमरोज नुरोद्दीन, नगरसेवक इब्राहिम पटेल (नाना) यांच्यासह शेख अहेमद सातसैलानी, महंमदरफी भाई, सय्यद अन्वर हुसेन, शेख अजीम दायमी, शेख अबरार, सय्यद सोफी आदींनी प्रवेश केला.

अजित पवार यांच्या हस्ते उदगीर नगरपंचायतीतील एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, राज्यमंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या