औरंगाबाद : अटक करण्यात आलेल्या ‘एमआयएम’च्या नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

औरंगाबाद  : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-या औरंगाबादमधील एमआयएमच्या दोन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. त्या दोघांनी दाखल केलेले जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहे.

महापालिकेच्या १६ ऑक्टोबर २०१७ रोजी सर्वसाधारण सभेत शहरातील पाणी प्रश्नावर चर्चा चालू असताना बायजीपुरा वॉर्ड क्रमांक ६० चे नगरसेवक शेख जफर शेख अख्तर आणि टाऊन हॉल वॉर्ड क्रमांक २० चे नगरसेवक सय्यद मतीन सय्यद रशीद यांनी गोंधळ घातला होता.

महापौरांचा राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबाबत या दोन नगरसेवकांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

You might also like
Comments
Loading...