औरंगाबाद : हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते’ : MIM नगरसेवक

टीम महाराष्ट्र देशा : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणारे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांची भाजप नगरसेवकांनी सभागृहात चांगलीच धुलाई केली. त्यावर स्वत: सय्यद मतीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा विषय महापौरांनी घेतला. वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सभागृह दाखविण्यात आली.

त्यानंतर एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांनी श्रद्धांजली अर्पण करण्याच्या ठरावाचा निषेध केला. त्यामुळे भाजपचे सदस्य संतप्त झाले. प्रमोद राठोड, राज वानखेडे, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे यांनी मतीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना अक्षरक्षः खाली पाडून लाथा- बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. माधुरी अदंवत यांनी चपलेने मारले.

bagdure

नगरसेवक सय्यद मतीन यांची प्रतिक्रिया :

अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला लोकशाही पद्धतीने आम्ही त्याला विरोध केला. मात्र, भाजपचे नगरसेवकांनी थेट माझ्यावरच हल्ला चढवला. दहा-दहा जणांनी हल्ला करून सभागृहाचा अवमान केला, हिम्मत होती तर एकेकाने यायचे होते. मग त्यांना दाखवले असते, हल्लाखोर भाजपच्या नगरसेवकांवर महापौरांनी त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली केली आहे.

अटलजींसारख्या देशव्यापी नेतृत्वाची उणीव भासेल : राज ठाकरे

You might also like
Comments
Loading...