औरंगाबाद : MIM नगरसेवक मतीन यांना अटक

टीम महाराष्ट्र देशा : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावावर भाषण करण्यास नकार देणारे औरंगाबादमधील एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांना आज अटक करण्यात आली आहे. त्यांना मारहाण करणाऱ्या भाजपाच्या नगरसेवकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शुक्रवारी महानगरपालिकेची समांतर वाहिनीसंदर्भात विशेष सभा बोलाविण्यात आली होती. सभेच्या सुरुवातीला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती. याला एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांनी विरोध दर्शवला. यामुळे संतप्त होत सभागृहातील भाजप नगरसेवक प्रमोद राठोड, दिलीप थोरात, माधुरी अदवंत, रामेश्वर भादवे, राज वानखेडे यांनी मतीन यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर नगरसेवक मतीन यांनी सभागृहातून पळ काढला होता. यानंतर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेत्यांच्या गाड्या फोडल्या होत्या.

औरंगाबाद महापालिकेत राडा करणाऱ्या एमआयएमच्या तीन नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी