एमआयएम-भाजप एकाच नाण्याच्या बाजू; कॉंग्रेसने भाजपला झापलं

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या सूचीविरोधात आंदोलने सुरू आहेत. पठाण यांनी एका सभेत बोलताना, ‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. आपणही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू, असे चिथावणीखोर वक्तव्य पठाण यांनी केले होते.

एमआयएमचे नेते वारिस पठाण यांच्या चिथावणीखोर वक्तव्याचा प्रदेश काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला. तसेच शिवसेना, भाजप, मनसेकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वारीस पठाण देशातील मुसलमानांना उद्देशून बोलले, आपण १५ कोटी आहोत, पण १०० कोटीला भारी आहोत, लक्षात ठेवा ही गोष्ट! अशा इशारा दिला. त्यानंतर देशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Loading...

हैदराबादच्या ओवैसी बंधुंचा एमआयएम पक्ष आणि भारतीय जनता पक्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने शुक्रवारी मुंबईत केला. एमआयएम भाजपच्या इशाऱ्यावर धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करते हे वेळोवेळी स्पष्ट झाले असून, कोणत्याही धर्माची कट्टरता ही देशासाठी घातकच आहे. त्यामुळे एमआयएम आणि भाजप या दोघांचाही निकराने विरोध झाला पाहिजे, असे मत प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केले.

दरम्यान, एकमेकांच्या विरोधाचे नाटक करून हिंदू महासभा आणि मुस्लिम लीग एकत्र सत्तेत सहभागीही झाल्या होत्या, असा दावा सावंत यांनी केला. चले जाव आंदोलनाचा विरोध करून यांनी ब्रिटिशांना साथ दिली आणि द्विराष्ट्रवादाचा सिद्धांतही मांडला हे ऐतिहासिक सत्य आहे. आज त्यांची जागा भाजप आणि एमआयएम ने घेतली आहे, असा आरोप सावंत यांनी केला.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट, पवार म्हणतात ‘ते’ दाखवण्याची गरज आहे का ?
'१४ एप्रिलनंतर महानगरं आणि बाधित जिल्हे वगळून ग्रामीण भागातील लॉक डाऊन उठवावे'
आमदार साहेब गोरगरिबांच्या अन्नात माती कालवू नका, राष्ट्रवादी-शिवसेनेतील वाद आला चव्हाट्यावर
संतापजनक : तब्लिगींमुळे चार दिवसांत कोरोनाचे रुग्ण दुप्पट
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना माझा सलाम ; या दिग्गज कलाकाराने केलं कौतुक
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका