रासप वर्धापनदिनाला लाखो लोक उपस्थित रहाणार- महादेव जानकर

मुंबई: –राष्ट्रीय समाज पक्षाचा वर्धापनदिन रविवार (दि २५ ) रोजी दादर येथील शिवाजी पार्क मैदानात साजरा होणार आहे. रासपचा हा १७ वा वर्धापनदिन असून राज्यभरातून लाखो लोक उपस्थित रहाणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. महादेव जानकर पुढे म्हणाले की, या वर्धापनदिन सोहळ्याला अध्यक्ष म्हणून राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत तर उदघाटन ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे करणार आहेत.

रासपच्या वर्धापनदिन कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील, उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, शिकण मंत्री आशिष शेलार, जलसंधारण मंत्री तानाजी सावंत, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, सदाभाऊ खोत उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर रासपचे आमदार राहुल कुल, आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित रहाणार आहेत. रासपचा हा कार्यक्रम भूतो न भविष्यती होणार असून राज्यातील लाखो नागरिक उपस्थित राहणार आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'दिवसातून काही तास का होईना मद्यविक्रीची परवानगी द्यावी'
वा रे पठ्ठ्या ! 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' काढला विकायला, जाणून घ्या किंमत
#Corona : लॉकडाऊन संपल्यानंतरही  'या' गोष्टी राहणार बंद
#Corona : भारत कोरोनाच्या तिसऱ्या फेजमध्ये, ICMRचा धक्कादायक रिपोर्ट
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत - रुपाली चाकणकर
हे मी पाच वर्ष भोगले...घराची रेकी झाली, जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त केली मनातील खंत
भारताबरोबर तबलीगीमुळे पाकमध्ये देखील हाहाकार!
औरंगाबादेत घडलेल्या 'या' घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकली
मोदींसोबतच्या बैठकीत संजय राऊत-शरद पवारांचा आरोप; 'राज्यपाल समांतर सरकार चालवताय'
औरंगाबाद : कोरोनामुळे संपली माणुसकी