भारतविरुद्ध पाकिस्तान मॅचवर कोटींचा सट्टा, BCCI आणि ICC चं खेळाडूंवर विशेष लक्ष

भारतविरुद्ध पाकिस्तान मॅचवर कोटींचा सट्टा, BCCI आणि ICC चं खेळाडूंवर विशेष लक्ष

ind pak

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 चा बहुचर्चित सामना रविवार 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या सामन्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय संघाने आतापर्यंत टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध एकही सामना गमावलेला नाही. या सामन्याने दोन्ही संघ स्पर्धेला सुरुवात करणार आहेत.

जगभरातील क्रिकेट फॅन्सचं लक्ष वेधणाऱ्या भारत-पाक मॅचवर आत्तापर्यंत 1000 कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे. तर या मॅचच्या टॉसनंतर सट्टा बाजार 1500 ते 2000 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या सामन्यावर ऑनलाईन बेटींग्स साईटच्या माध्यमातून जगभरातील सर्व बड्या आणि हायप्रोफाईल सट्टेबाजांनी या पैसा लावला आहे.

दरम्यान, बीसीसीआयचे एंटी करप्शन युनिटचे वरीष्ठ अधिकारी सध्या यूएईमध्ये आहेत. त्यांचं प्रत्येक मॅचवर बारीक लक्ष असणार आहे. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे की, ‘आमचे अधिकारी आणि लोकल एजन्सींचं प्रत्येक बारीक हलचालींवर लक्ष ठेवत आहे. त्यामध्ये खेळाडूंच्या सुरक्षेचाही मुद्दा आहे.’ असं या एजन्सीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर दुबईतील अंडरवर्ल्डचीही नजर आहे. भारत-पाकिस्ताम मॅच येथील अंडरवर्ल्डचा आवडीचा विषय आहे. याठिकाणी या मॅचवर खूप मोठ्या प्रमाणात सट्टा लागल्यास बुकी काही प्लेयर्सच्या माध्यमातून मॅच फिक्स करण्याचीही शक्यता असते. त्यामुळे BCCI आणि ICC च्या एंटी करप्शन युनिटचं प्रत्येक खेळाडूंवर विशेष लक्ष आहे.

महत्त्वाच्या बातम्या