सावधान ! पुण्यातील दुधामध्ये आढळली मोठी भेसळ

२००७ मध्ये अन्न व औषध विभागाने पुण्यातील दुधाचे नमुने जमा करून त्याची तपासणी केली होती. त्यावेळी मोठ्याप्रमाणात भेसळ आढळून आली होती. २००७ नंतर परिस्थिती बदलेन अस वाटल होत पण अजूनही काहीच बदल झाला नाही.

पुण्यातील द इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राने माहितीच्या अधिकारा अंतर्गत अन्न व औषध विभागातून एक माहिती मागविली होती. त्या अंतर्गत ३७% दुधाच्या नमुन्यामध्ये भेसळ आढळून आली आहे. अन्न व औषध विभागाने मागीलवर्षी १४२ नमुने मागवले होते. त्यातील ५३ नमुन्यामध्ये मोठ्या प्रमाणत भेसळ आढळून आली. सर्व नमुने हे डेरी, हॉटेल येथून जमा करण्यात आले होते.
भेसळीमध्ये युरिया, फॅट वाढविणारे पदार्थाची भेसळ करण्यात आली आहे. दुध व त्याबरोबर दुग्धजन्य पदार्थ जसे सुगंधी दुध, पनीर, मिल्क पाऊडर यामध्ये ही भेसळ आढळून आली आहे.
.

You might also like
Comments
Loading...