आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण…..

पुणे : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात लोकडाऊन आहे. परंतु याचा फटका आता पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाला मोठ्या प्रमाणावर बसू लागला आहे. दूध संकलनाच्या प्रमाणात वितरण होत नाही. त्यामुळे आज (रविवार) सायंकाळी आणि उद्या (सोमवारी) सकाळी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय संघाने घेतला आहे.

राज्य सकारने लोकडाऊन केल्यामुळे गेल्या काही दिवसात दूध मोठ्या प्रमाणात संकलण होत आहे. त्यामुळे दूधाचा शिल्लक साठाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. दूध संकलन आणि वितरण या संदर्भात राज्य सरकारचे निश्चित धोरण नाही. त्यामुळे पुरेशा प्रमाणात दूधाचे वितरण होत नाही. परिणामी दूधाच्या शिल्लक साठ्यात वाढ होत आहे.

या पार्श्वभूमीवर संघाने हा निर्णय घेतला आहे. आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दूध संकलन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना सर्व दूध संकलन केद्रांना दिल्या आहेत.