दूध दर आंदोलन : मंत्री सुनील केदार यांच्या पुतळ्याला रयत क्रांती संघटनेतर्फे दुधाने अंघोळ

pandurang shinde

मांजरम/प्रतिनिधी- रयत क्रांती संघटना महायुतीच्या वतीने आज मांजरम येथील हनुमान मंदिरासमोर पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार यांच्या पुतळ्याला दुधाने अंघोळ घालून प्रतिमात्मक आंदोलन युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

मंत्री सुनील केदार यांचा पुतळा तयार करून त्यांना दुधाने अंघोळ घालून, मंत्री जागे हो… जागे हो ..शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा. आंधळे, बहिरे झोपलेले सरकार जागे व्हा… शेतकऱ्यांच्या दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान द्या… दूध पावडरला किलो ५० रुपये अनुदान अशा घोषणा करणत आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले, लॉक डाऊन च्या काळात शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे, या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. दुधाला लॉक डाऊनच्या पूर्वी पेक्षा ५०% भाव कमी झाले आहेत गाईच्या दुधाला प्रती लिटर १५ ते १७ रुपये पर्यत भाव मिळत आहे.त्याचा खर्च ३५ ₹ रुपयां पर्यत आहे.म्हशीच्या दुधाला सुद्धा खूपच कमी भाव मिळतो खर्च सुद्धा निघत नाही.

शिंदे म्हणाले, आज दुधाला प्रति लिटर बंद पाणी बाटली पेक्षा कमी भाव मिळत आहे म्हणून आज आम्ही मंत्री सुनील केदार यांचा पुतळा करून दुधाने आंघोळ घातलो आहोत. आज हॉटेल,चहाच्या बंद झाले आहेत,शहरातील लोक गावाकडे आले आहेत त्यामुळे दुधाची मागणी कमी झाली. अतिरिक्त दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मांडले आहे त्याला उभा करण्यासाठी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर १० ₹ रुपये अनुदान आणि दूध पावडर प्रति किलो ५० रुपये अनुदान द्यावे आणि दूध पावडर आयात रद्द करावे ही आमची प्रमुख मागणी आहे.

सरकारने ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाही तर १ ऑगस्ट रोजी दूध बंद एल्गार आंदोलन भाजपा, रासप, शिवसंग्राम,रिपाई (आ),रयत क्रांती संघटना,महाराज साम्राज्य संघ या महायुतीचे वतीने तीव्र आंदोलन करणार अशा इशारा देण्यात आला आहे.यावेळी शामराव पाटील, भानुदास पाटील ,बालाजीराव शिंदे ,विलास शिंदे, शिवराज शिंदे, देवराव माली पाटील व शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

विलगीकरणातील व्यक्तींना घरबसल्या मिळणार कोरोनाविषयी वैद्यकीय सल्ला !

गुजरात भाजपची जबादारी आता चंद्रकांत पाटलांच्या खांद्यावर…

पुण्यात कोरोनामुक्त पोलीस समुपदेशकाची भूमिका बजावणार : सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे

पुणे : उपचार मिळण्यात प्रचंड अडचणी; ‘आप’चे मनपा आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन

जयंत पाटील हा अत्यंत तज्ञ, बुद्धिवान आणि पंडित माणूस, पडळकरांचा जोरदार टोला