दूध उत्पादक शेतकरी आक्रमक ; सरकारचा निषेध म्हणून गाढवाला दुग्धाभिषेक

टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दूध दरात प्रति लिटर पाच रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. राज्य शासन दूधाचे दर वाढवित नसल्याचे पाहून राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनही सुरू केले आहे.

दरम्यान, वाशीम येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत गाढवालाच दुधाने आंघोळ घालण्यात आली. शेतकरी कर्ज काढुन दुधाळ जनावरे घेतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यातही दुधाचे भाव कमी झाले असून दूधसंकलनही बंद केल्यास त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे असे मत संघटनेचे जिल्हा संघटक गजुअण्णा पैठनकर यांनी व्यक्त केले.

दरवाढीशिवाय माघार नाही : राजू शेट्टी

दूध दरवाढीवर तोडगा नाहीच; पुण्यात दूध कोंडी होण्याची शक्यता