#महापूर : पुरग्रस्तांना सैनिकी हेलीकॉप्टरमधून अन्न पुरवठा, सेवाभावी संस्था मदतीसाठी अग्रेसर

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने हाहाकार घातला आहे. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक गेले ५ दिवस पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन युद्धपातळीवर मदत करत आहे. तर सेवाभावी संस्थांनी देखील या कठीण प्रसंगात प्रशासनाला साथ देत मदत कार्य सुरु केले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांच्या अन्न पाण्याची सोय या संस्थांनी केली आहे. तर सैन्याने हेलीकॉप्टरमधून दुपारी दीड वाजल्यापासून अन्न व पाण्याची पाकिटांचा पुरवठा सुरु केला आहे.

सैनिकी हेलीकॉप्टर कवलापूर येथील विमानतळावर दुपारी बारा वाजता आणण्यात आले. त्या ठिकाणी प्रशासन, स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तयार केलेली पाकीटं, पाण्याच्या बाटल्या एकत्रित करुन सांगली शहरासह अनेक गावात पोहोचवण्यात आल्या. आणि अन्न व पाण्याची पाकिटे हवेतून टाकण्यात आली. तसे पाहता सांगली कोल्हापूर जिल्ह्यात परिस्थिती अतिशय बिकट आहे. या आपत्तीत नागरिक आणि प्रशासन हतबल झाले आहे. मात्र महाराष्ट्रातल्या अनेक भागातून सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन या परिस्थितीवर मात करण्याचा विडा उचलला आहे.

दरम्यान कोल्हापूर – सांगली जिल्ह्यात महापुराने जनजीवन विस्कळीत केले आहे. अनेक छोट्या – मोठ्या नद्या पात्र सोडून वाहत आहेत. तर सर्व जिल्ह्याचा ताबा पुराच्या पाण्याने घेतला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिक पाण्यात अडकले आहेत. या आपत्तीवर प्रशासन मदत कार्य करत आहे. मात्र प्रशासनाची बचाव यंत्रणा या विदारक परिस्थितीत ढेपाळली आहे. एका बाजूला मृतांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाची बचाव यंत्रणा तोकडी पडत आहे. यासाठी सरकारकडून मदतीचे आवाहन केले जात आहे.

 

राज्य सरकारच्या आलमट्टी धरणांतून पाणी सोडण्याच्या प्रस्तावाला कर्नाटक सरकारचा कानाडोळा

#कोल्हापूर – सांगली महापूर : ढेपाळलेल्या यंत्रणेवरून संतप्त नागरिकांनी महाजनांना विचारला जाब

कर्नाटक – महाराष्ट्र सरकारवर खुनाचा खटला दाखल करावा, महापुरावरून पटोले झाले आक्रमक