मुंबई : शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का निवडणूक आयोगाने दिला आहे. शिवसेनेचं धनुष्यबाण हे पक्ष चिन्ह आता गोठवण्यात आले आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता अंधेरी पोटनिवडणूकीत धनुष्यबाण चिन्ह व शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही. आयोगाच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटातील नेते चांगलेच आक्रमक देखील झाले आहेत. मात्र चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर आता शिवसेनेचे सचिन मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आहे.
काय आहे नार्वेकरांचं ट्विट?
शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आल्यानंतर आता शिवसेनेचे सचिन मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता अनेक चर्चा सुरु झाल्या आहेत. मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हाबाबत सूचक ट्विट केले आहे. मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट केला आहे. वाघाचा फोटो ट्विट करून त्या फोटोमध्ये आमचे चिन्ह श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे असा मजकूर आहे. नार्वेकरांच्या ट्विटनंतर शिवसेना वाघाचे चिन्ह मागणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.
चिन्हांबाबत अंतिम मुदत-
अंधेरी पूर्व विधानसेभेच्या पोटनिवडणुकीसाठी आता दोन्ही गटांना स्वत:च्या पक्षासाठी नवीन नावाची आणि नवीन निवडणूक चिन्हाची निवड करावी लागणार आहे.दोन्ही गटाला मुक्त चिन्हांमधल्या 3 चिन्हांची निवड करून ते निवडणूक आयोगाकडे सादर करावे लागणार आहेत. या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून कोणत्या चिन्हांची निवड करण्यात येणार याची उत्सुकता आता शिंगेला पोहोचली आहे. सोमवारी, 10 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजेपर्यंत नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय आयोगाकडे सादर करण्याचा आदेश आयोगाकडून देण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Car Update | ‘या’ आहेत बेस्ट मायलेज देणाऱ्या कार
- Sharad Pawar | निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Chandrakant Khaire । “धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यामागे फडणवीसांचा कट”, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप
- Maharashtra Rain Update | राज्यात आज ‘या’ भागांत पावसाचा येलो अलर्ट
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांची निवडणूक आयोगाकडे ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नाव देण्याची मागणी