का होत नाही मिलिंद एकबोटेंना अटक? विश्वास नांगरेंनी दिलं हे उत्तर

पोलीस कोठडी घेऊन करणार चौकशी

पुणे : कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. एकबोटे यांच्या जामीन अर्जावर आता पुढील सुनावणी आता १४ मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षणही मिळाले आहे. मिलिंद एकबोटे यांना अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे.

दरम्यान, मिलिंद एकबोटेंना अटक का केली नाही, असा प्रश्न कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना विचारला असता, ते म्हणाले, “मिलिंद एकबोटेंना आधीच दिलासा मिळाला होता. त्याअनुषंगाने आम्हाला पोलीस कोठडी घेऊन, चौकशी करायची आहे. फक्त अटक करुन जामीन मिळू द्यायचा नाही. त्यामुळे आमची कोठडीची मागणी आहे. त्यानुसार १४ मार्चला ताकदीनिशी न्यायालयात बाजू मांडू.” ते पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारला जाब

मिलिंद एकबोटे यांना अटक का करण्यात आली नाही? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला विचारला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या एकबोटेंना आतापर्यंत का अटक केली नाही, या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने हास्यास्पद उत्तर दिलं. एकबोटे आम्हाला सापडलेच नाहीत, सातत्यानं गायब होते, या सरकारच्या दाव्याचा खुद्द एकबोटेंच्या वकिलांकडून नकार करण्यात आला. आम्ही पोलिसांकडे जायला तयार आहोत, त्यांना पूर्ण सहकार्य द्यायला तयार आहोत, तेच बोलवत नाहीत. सरकारनं या प्रकरणाचा तपास करुन गरज पडल्यास एकबोटेंना अटक करावी. या तपासात एकबोटे कसं सहकार्य करतात, यावर त्यांच्या जामिनाबाबतचा पुढचा निर्णय घेऊ असं कोर्टानं म्हटलं आहे. पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.

You might also like
Comments
Loading...