मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे. त्यामुळे एकबोटेंच्या अडचणी आणखीन वाढणार असून त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एकबोटे यांनी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सत्र न्यायालयानेही त्यांचा अटकपूर्व जमीन नाकारला होता.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदी कायदया अंतर्गत पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पुढे तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेला 1 महिना उलटूनही एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने राजकीय नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत आहे.

You might also like
Comments
Loading...