स्वप्नात सुद्धा आपल्याच माणसांवर हात उगारणार नाही;जय भीम ,जय शिवराय -एकबोटे

पुणे – समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे यांनी एक व्हिडिओ क्लिप द्वारे कोरेगाव भीमा प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे .कालच्या घटनेवरून माझी तसेच समस्त हिंदू आघाडीची बदनामी करण्याचा फुटीरतावादी संघटनांनी प्रयत्न चालवला आहे . स्वप्नात सुद्धा आपल्याच माणसावर हात उगारण्याची भूमिका समस्त हिंदू आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये येऊ शकत नाही त्यामुळे अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे .

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभरात उमटले आहेत. भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उद्या बंदची हाक दिली आहे. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदू एकता आघाडी यांनी हा हिंसाचार घडवून आणला असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे या सगळ्या प्रकरणाचे सूत्रधार आहेत असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. हिंदुत्त्ववादी संघटनांना कोरेगाव ते शिरुर आणि कोरेगाव ते चाकण या पट्ट्यातील गावांनी मदत केल्याचा आरोपही त्यांनी केली. तसेच या गावांचे अनुदान पुढील दोन वर्षांसाठी बंद करावे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

या सगळ्या प्रकारानंतर मिलिंद एकबोटे यांनी व्हिडिओ क्लिप द्वारे कोरेगाव भीमा प्रकरणावर आपली भूमिका मांडली .काल कोरेगाव-भीमा या ठिकाणी जो प्रकार घडला तो दुर्दैवी असून दलित बांधवाना जो त्रास सहन करावा लागला त्याचा आम्ही निषेध करतो.मात्र या घटनेवरून माझी तसेच समस्त हिंदू आघाडीची बदनामी करण्याचा फुटीरतावादी संघटनांनी प्रयत्न चालवला आहे . समस्त हिंदू आघाडी नेहमी दलित समाजाशी एकनिष्ठ राहिली असल्याचा दावा देखील एकबोटे यांनी केला आहे.स्वप्नात सुद्धा आपल्याच माणसावर हात उगारण्याची भूमिका समस्त हिंदू आघाडीच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या मनामध्ये येऊ शकत नाही त्यामुळे अपप्रचाराला बळी पडू नका असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…
Loading...