मिलिंद एकबोटे पोलीस स्टेशनमध्ये हजर

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अखेर मिलिंद एकबोटे पोलीस स्टेशनमध्ये हजर झालाय. पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर स्टेशनमध्ये मिलिंद एकबोटेला हजर केलंय.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आधी पुणे सेशन कोर्टाने मिलिंद एकबोटेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर एकबोटेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही फटकारल्यानंतर एकबोटे पुढील सर्व मार्ग बंद झाली आहे.

मिलिंद एकबोटेंना अटक अजून का केली नाही असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारत राज्य सरकारला फटकारून काढलं होतं. त्यानंतर अखेर पोलिसांनी मिलिंद एकबोटेला शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये हजर केलंय. मात्र, एकबोटेला अजून अटक झाली की नाही हे अद्याप पोलिसांनी सांगितलेलं नाही.