कोरेगाव भीमा दंगल: अखेर मिलिंद एकबोटेला अटक 

या तीन मुद्द्यांवर मिलिंद एकबोटेचा जामीन नाकारला

पुणे : कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी आरोप असलेले मिलिंद एकबोटे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. आज एकबोटे यांच्या अंतरीम जमीनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. दरम्यान,अंतरीम जमीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता.

राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये मिलिंद एकबोटे हे तपासात सहकार्य करत नसल्याचे म्हंटले होते. या अहवालानुसार अंतरीम जमीन देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एकबोटेना अटक केली आहे.

या तीन मुद्द्यांवर मिलिंद एकबोटेचा जामीन नाकारला

१. एकबोटेंच्या विरोधात यापूर्वी असेच गुन्हे दाखल आहेत

२. त्यांनी मोबाईल जमा केला नाही, हरवल्याचे सांगितले.

३. सोबत कोण लोक होते, यासंदर्भात एकबोटे काहीच बोलत नाहीत. चौकशीसाठी सहकार्य करत नाहीत.

कोण आहेत मिलिंद एकबोटे ?

मिलिंद एकबोटे हे समस्त हिंदू आघाडी नावाची संघटना चालवतात. दादोजी कोंडदेव पुतळा हटवतानाही त्यांनी तीव्र विरोध केला होता. त्याचप्रमाणे अफजल खानाची समाधी हटवण्यासाठीही त्याने आंदोलन केलं होतं. एकबोटेची वहिनी पुणे महापालिकेत भाजपची नगरसेविका आहे.. डिसेंबरमध्ये शनिवार वाड्यावर डाव्या संघटनांनी भरवलेल्या एल्गार परिषदेला मिलिंद एकबोटेंनी कडाडून विरोध केला होता.

You might also like
Comments
Loading...