मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट ; सचिन सावंत

sachin sawant

मुंबई: भीमा कोरेगाव येथे झालेल्या दगफेकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंद ची घोषणा केली होती. त्या दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. दगफेक व वाहनांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पोलिसांकडून कोंबिग ऑपरेशन सुरु करण्यात आले. मात्र कोंबिग ऑपरेशन थांबवा म्हणून अनेक राजकीय नेत्यांनी म्हटले आहे. दरम्यान हे कोंबिग ऑपरेशन एकतर्फी असून त्वरित थांबवण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सचिन सावंत म्हणाले, कोंबिग ऑपरेशन मुळे अनेक निरपराध तरूण, महिला, अल्पवयीन मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विनाचौकशी, रात्री अपरात्री घरात घुसून अटक करण्यात येत आहे. दुसरीकडे या प्रकरणात ज्याच्यावर गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर मात्र कारवाई करतांना पोलीस दिसत नाहीत. दलित समाजातील तरुणांविरुद्ध सुरू असलेली कोंबिग ऑपरेशनची कारवाई त्वरीत थांबवली पाहिजे. तसेच या प्रकरणात गुन्हे दाखल असलेले मिलिंद एकबोटे आणि मनोहर भिडे हे मात्र मोकाट आहेत, यातून पोलिसांची सध्या सुरू असलेली कारवाई एकतर्फी असल्याचेच दिसून येते. पोलीस फक्त दलित समाजातील लोकांवर कारवाई करत असून काँग्रेस या कारवाईचा आणि अटकसत्राचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत आहे.