मिलिंद एकबोटेचा जेलमधील मुक्काम वाढणार

पुणे: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी अटकेत असलेल्या मिलिंद एकबोटेचा जेलमधील मुक्काम वाढणार आहे. कारण आज एकबोटेला शिवाजीनगर न्यायालयमध्ये हजर करण्यात आल असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दंगली प्रकरणी मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आलेली आहे. दंगल भडकवण्याचा कट रचल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी न्यायालयात हजर करण्यात आल असता एकबोटेवर शाई फेकण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता.