fbpx

कॉंग्रेसमध्ये राजीनामासत्र सुरूच, आता देवरांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीमाना

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची स्थापना करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये पुढील राष्ट्रीय भूमिका स्वीकारण्यासाठी मिलिंद देवरा हे दिल्लीत जाऊ शकतात. राजीनाम्या संदर्भातील एक पत्र नुकतेच देवरा यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे सुपुर्द केल्याची माहिती आहे.