हा तर सत्तेचा माज ; मिलिंद देवरांची सरकारवर टीका

टीम महाराष्ट्र देशा : कानडी नाट्याच्या दुसऱ्या अंकाला सुरवात झाली आहे. काँग्रेस नेते आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री डी.के.शिवकुमार सरकार वाचवण्यासाठी आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करत आहेत. मात्र ‘काँग्रेस नेत्यांनी डी.के शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याचं पत्र मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. त्यामुळे आता डीके शिवकुमार आणि अन्य कॉंग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान या प्रकरणावर कॉंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हॉटेलच्या बाहेर शांततेने प्रसार माध्यमांशी संवाद साधत होतो. संवाद साधतेवेळीच पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतले. ज्या पद्धतीने सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे ते खूप लाजिरवाणे आहे, असे देवरा यांनी म्हंटले.

बंडखोर आमदारांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेस नेते डी.के शिवकुमार मुंबई येथे आले होते. मात्र ‘काँग्रेस नेते डी.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,’ असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहील्याने डी.के शिवकुमार यांना मुंबई पोलिसांनी अडवले होते. कॉंग्रेसच्या आमदारांना भेटू दिले नाही. यावेळी हॉटेल बाहेर गोधळ झाला. त्यानंतर पोलिसांनी मिलिंद देवरा आणि डी.के शिवकुमार यांना ताब्यात घेतले.त्यावर देवरा यांनी प्रतिक्रिया दिली.