प्रभारी पोलिस आयुक्त म्हणुन मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारला

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये आठ तारखेला मिटमिटा गावात पोलीस आणि गावकऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यात गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्याला प्रत्तुतर देण्यासाठी पोलिसांनीही काही घरांवर दगडफेक केली .काही नागरिकांना अटक करण्यात आली. पोलिसांनी कायदा हातात घेऊन केलेल्या मारहाणीचे पडसाद विधानसभेत देखील उमटले.

या मुद्द्यावरुन आमदारांनी सभागृहात गदारोळ निर्माण करत पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्यावर कारवाईची मागणी केली . यावर निर्णय देत मुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांना सक्तीच्या रजेवर पाठवले . त्यामुळे नाराज होत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पुन्हा औरंगाबादमध्ये येण्याची इच्छा नसून औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न लवकरात लवकर सुटावा, अशी इच्छा व्यक्त केली. यानंतर प्रभारी पोलिस आयुक्त म्हणुन मिलिंद भारंबे यांनी पदभार स्वीकारला.

पोलीस आयूक्त यशस्वी यादव यांनी मिटमिटा लाठीहल्ला प्रकरणी नेमलेल्या पोलीस उप आयूक्त डॉ दिपाली घाडगे यांच्या चौकशी समीतीच्या अंतरीम अहवालावरून गैरवर्तन करणारे महिला पोलीस शिपाई श्रीमती कपीला मद्वेमवार, रतन धानूरे, किसन मार्कंडे यां तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे .