Breaking: मिलिंद एकबोटेवर कोर्ट आवारात हल्ला; काळे फासण्याचा प्रयत्न

पुणे: कोरेगाव-भीमा प्रकरणी अटक असलेले मिलिंद एकबोटेवर आज शिवाजीनगर कोर्ट आवारात हल्ला करण्यात आला आहे. तसेच यावेळी त्यांना काळे फासण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने मिलिंद एकबोटेला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

१ जानेवारी २०१८ रोजी येथे शौर्य दिनानिमित्त विजयस्थंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो भिम अनुयायी कोरेगाव भीमा येथे आले होते. दरम्यान दोन गटांमध्ये जोरदार दगडफेक झाली. यामध्ये अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. तर यामध्ये एका युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान, हि सर्व दंगल भडकवण्याचा आरोप एकबोटेंवर करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा दंगल प्रकरणातील मुख्य आरोपी मिलिंद एकबोटेला १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे होती. आता पुन्हा एकबोटेंच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

You might also like
Comments
Loading...