महाराष्ट्रातील ‘या’ भागात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के !

सातारा : कोयना धरण परिसर हा संवेदनशील भाग म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवत असतात. आज सकाळी देखील या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असून भीतीचे कारण नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

सातारा जिल्ह्यातील काही भागासह कोयना धरण परिसरात 3.3 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे धक्के जाणवले. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. कोयनापासून अवघ्या 10 किलोमीटरच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपाच्या धक्कामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण होते. मात्र, भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही हानी झालेली नाही.

यासोबतच, कोयना धरणाला कुठलाही धोका नसल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाकडून नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं ही माहिती दिली आहे. यापूर्वी 8 मे रोजीही साताऱ्यात भूकंपाचे काही सौम्य धक्के जाणवले होते. तर, मणिपूरमध्ये देखील सकाळी ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेच्या कंपनाची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP