मिका सिंगने असा केला वाढदिवस साजरा ; तुम्हालाही वाटेल अभिमान

मिका-सिंग

मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत ही वाढत होत आहे. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाची या बिकट परिस्थितीमध्ये बॉलवूडमधील अनेक सेलिब्रिटी लोकांच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.

Image

कोरोना काळात देशभरातील हजारो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे लोकांवर भूकमारीची वेळी आहे. लोकांना एक वेळचं अन्न खाण्यासाठी देखील काही जणांकडे पैसे उरलेले नाहीत. अशा परिस्थितीत देशभरातील अनेक सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे करत आर्थिक मदत तसेच जेवण देखील पुरवताना दिसत आहेत.

Image

प्रसिद्ध बॉलिवूड गायक मिका सिंग याने देखील आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं तब्बल 10 हजार लोकांना अन्नदान केलं. त्याच्या वाढदिवसानिमित्त मिका सिंगने गरीबांना अन्नदान केलं आहे. आज मिका सिंगचा वाढदिवस आहे.  44व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

 

IMP