बाबा राम रहिमला ट्विटरने दिला दणका

baba ram rahim twitter

बलात्कारी बाबा राम रहिमला शिक्षा सुनावण्यात आल्याबरोबर ट्विटरने देखील बाबाला दणका दिला आहे . लैंगिक शोषण प्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने २० वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर याच बाबा राम रहिमचे ट्विटर अकाऊंट, ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग वेबसाईटने बंद केले आहे.

राम रहिम हा ट्विटरवर अॅक्टिव्ह होता, या अकाऊंटवर त्याचे अनेक फॉलोअर्स आहेत. मात्र आता गुरमित राम रहिम असे ट्विटरवर सर्च केले असता, ‘@Gurmeetramrahim‘s account has been withheld in: India.’ असा संदेश दाखविण्यात येतो. गुरमित राम रहिम या नावाने जर ट्विटरवर सर्च केले तर हे अकाऊंट बंद करण्यात आल्याची सूचना ट्विटरकडून मिळते.भारतात राम रहिमचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात आले आहे असा संदेशही समोर येतो
बऱ्याचदा ट्विटर सुरक्षेचा उपाय म्हणून कोणतेही अकाऊंट एखाद्या देशापुरते बंद करू शकते, गुरमित राम रहिमचे ट्विटर अकाऊंट भारतापुरतेच बंद करण्यात आले आहे. हे अकाऊंट गुरमित राम रहिम याने स्वतः बंद केले आहे की सरकारी यंत्रणांनी ते बंद केले आहे याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.