‘स्टीव्ह स्मिथने मैदानात जास्त ढवळाढवळ करू नये’

‘स्टीव्ह स्मिथने मैदानात जास्त ढवळाढवळ करू नये’

Steve Smith

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया संघाचा माजी कर्णधार (Australia Cricket Team)  टीम पेनने (tim pen) त्याच्यावर लागलेल्या गंभीर आरोपानंतर कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टिम पेनने 2017 मध्ये एका महिलेला अश्लील मेसेज पाठवले होते आणि अश्लील फोटोही पाठवले होते. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे.

ऍशेस मालिकेपूर्वी टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. टीम पेनच्या राजीनाम्यानंतर पॅट कमिन्स किंवा स्टीव्ह स्मिथला कर्णधार बनवले जाऊ शकते, असे मानले जात आहे. या शर्यतीत पॅट कमिन्सचे नाव आघाडीवर आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क (Michael Clarke) ने स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) वर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. स्टीव्ह स्मिथने मैदानात फारशी ढवळाढवळ करू नये तसेच त्याने कोणतेही मार्गदर्शनही करू नये, असे त्याने म्हटले आहे. क्लार्कच्या मते, मैदानातील गोष्टी कर्णधार असलेल्या खेळाडूने हाताळल्या पाहिजेत. तसेच एकच कर्णधार असू शकतो.

क्लार्क, पॅट कमिन्स कर्णधार झाला तर तो स्मिथचा सल्ला स्वत: घेईल. पण स्मिथने स्वतः जास्त ढवळाढवळ करू नये. स्टीव्ह स्मिथने थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कारण टीम पेन कर्णधार असताना खूप हस्तक्षेप करत असल्याची टीका त्याच्यावर झाली होती. स्लिपमध्ये उभा राहून तो क्षेत्ररक्षकांना फिरवत होता. तो उपकर्णधार असेल किंवा नसेल तर त्याला या गोष्टींबाबत खूप काळजी घ्यावी लागेल. मैदानात एकच कर्णधार असू शकतो. जर पॅट कमिन्स कर्णधार झाला तर तो स्वतः तुमचा सल्ला घेईल पण ते ठरवायचे काम त्याचे आहे.

महत्वाच्या बातम्या