IPL 2019 : मुंबई-चेन्नईत फायनल; कोण जिंकणार?

mi vs csk

टीम महाराष्ट्र देशा- रविवारी म्हणजेच 12 मे रोजी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलची फायनल मॅच खेळली जाणार आहे. आयपीएलचा खिताब तीन वेळा आपल्या नावावर केलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्यात फायनल मॅच रंगणार आहे.

Loading...

चेन्नईचा संघ आठव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सनं पाचव्यांदा धडक दिली आहे. या दोघांमध्ये आतापर्यंत तीन फायनल लढती झाल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईनं दोन वेळा चेन्नईला पराभूत केलं आहे. एकदा धोनीच्या संघाकडून मुंबईचा पराभव झाला आहे.

चेन्नईने आठव्यांदा फायनलमध्ये धडक दिली असली, तर कर्णधार धोनी नवव्यांदा फायनल खेळणार आहे. चेन्नईकडून आठव्यांदा तर पुणे सुपरजायंट्सकडून एकदा धोनी फायनलमध्ये खेळला आहे. धोनीनंतर सर्वाधिक फायनलमध्ये खेळणाऱ्यांमध्ये सुरेश रैनाचा नंबर लागतो. रैना 7 वेळा फायनलमध्ये खेळला आहे.

कर्णधार म्हणून रोहित १०० टक्के यशस्वी ठरला आहे. २०१०मध्ये मुंबईचा फायनलमध्ये पराभव झाला होता, पण त्यावेळी सचिन तेंडुलकर कर्णधार होता. या मोसमात चेन्नई आणि मुंबई तीन वेळा आमनेसामने आले आहेत. पण प्रत्येक वेळी रोहितच्या संघानं मैदान मारलं आहे.Loading…


Loading…

Loading...