‘मी पुन्हा येईन’ या मागच्या भूमिकेचे फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण म्हणाले…

blank

टीम महाराष्ट्र देशा : ‘मी पुन्हा येईन’ ही कवितेची साधी ओळ आहे. निवडणूक प्रचारावेळी तिचा मी उल्लेख केला. लोकांना ही ओळ आवडली. त्यात कोणताही गर्व नव्हता आणि कसला दर्पही नव्हता, असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ते एका वृत्तवाहिनीत मुलाखत देताना बोलत होते.

तसेच ‘मी म्हणजेच महाराष्ट्र. मी म्हणेन तो महाराष्ट्र माझ्या आसपास कुणीच नाही… हा देवेंद्र फडणवीसांनी दाखवलेला ‘मी’पणाचा दर्प जनतेला सहन झाला नाही आणि त्याचीच किंमत त्यांना मोजावी लागली, अशी टोला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर लगावला होता.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ‘गेल्या पाच वर्षात एकही सुट्टी न घेता जनतेची सेवा केली, याचा आनंद असल्याचंही फडणवीस यांनी या सांगितलं. मला माझ्या मर्यादा आणि क्षमता माहीत आहेत, असे देवेंद्र फडणवीस या मुलाखती दरम्यान बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्यात रंगलेल्या सत्तास्थापनेच्या नाट्यावर अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. राज्यातील जनता साखर झोपेत असतानाचं देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. फडणवीस यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची  शपथ घेतली होती. या घडलेल्या घडामोडींवर फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला आहे.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावा फडणवीस यांनी बोलताना केला. फडणवीस यांच्यावर या दाव्यावर अजित पवार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, ‘काँग्रेस आणि शिवसेनेसोबत सरकार चालवणं शक्य नाही. भाजपसोबतच सरकार स्थापन केलं पाहिजे, असं मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगितलं आहे. शरद पवार यांना या गोष्टीची कल्पना दिली आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आम्हाला सांगितलं होतं.

दरम्यान, त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत सत्तास्थापन केली,’ असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ‘आम्ही राष्ट्रवादीकडे गेलोच नव्हतो. तर अजितदादाच आमच्याकडे आले होते,’ असा दावाही त्यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या