एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पीसीबी गटात अभिजित कदम याने 200 पैकी 188 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

तर पीसीएम गटात 200 पैकी 195 गुण मिळवत आदित्य अभंग पहिला आला आहे.पीसीबी गटात जानवी मोकाशी 200 पैकी 183 गुण मिळवत मुलींमध्ये प्रथम आली आहे. तसेच पीसीएम गटात मोना गांधी हिने 200 पैकी 189 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

 

You might also like
Comments
Loading...