हे सरकार सूड उगवणारे नाही – CM ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : आता सरकार बदलले आहे आणि हे सरकार सूड उगवणारे नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. सरकार येते सरकार जाते मात्र राज्यातील जनता आणि शेतकरी महत्त्वाचा घटक आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असेही ते म्हणाले.

सांगलीच्या इस्लामपूरमध्ये मुख्यमंत्री ठाकरे हे राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दौऱ्यावर आहेत. यावेळी राजारामबापू दूध संघाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या दूध भुकटी प्रकल्प आणि पशुखाद्य प्रयोगशाळेचे उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री ठाकरे यांच्याहस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.

Loading...

पुढे बोलताना ठाकरे म्हणाले, ‘दुष्काळानंतर बऱ्याचदा जनावरांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या आहारासोबत आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरते पशू चिकित्सालय सुरु करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

दरम्यान, महाराष्ट्राचे सरकार लेचे-पेचे नाही. त्यामुळे मदतसाठी दुजाभाव करणाऱ्या दिल्लीसमोर ते झुकणार नाही, असा इशाराच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील भाजप सरकारला दिला आहे. तसेच देशाची अर्थव्यवस्था कोमात गेली असून आधीचेच सरकार बरे होते,अशी टीकाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
जयंत पाटील आणि मी अडचणीतले 'प्रदेशाध्यक्ष' : बाळासाहेब थोरात