गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार, म्हाडाकडून ५,०९० घरांची घोषणा

टीम महाराष्ट्र देशा :  गिरणी कामगारांसाठी मोठी बातमी आहे. म्हाडाने मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार असल्याची घोषणा केली आहे.

Loading...

गेल्या कित्तेक दिवसापासून घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांसाठी म्हाडाने एक आनंदाची बातमी दिली आहे. या वृत्ताने मुंबईत गिरणी कामगारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हाडाने आज ( ९ जुलै ) मुंबईत गिरणी कामगारांसाठी लवकरच तब्बल ५,०९० घरांची लॉटरी निघणार असल्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे तर या घरांसह राज्यभरात एकूण १४,६२१ घरांसाठी १५ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्याने जाहिरात काढण्यात येणार असल्याचेही या घोषणेत म्हंटले आहे.

येत्या १५ ते २० दिवसांत म्हाडाकडून पुनर्विकास धोरण जाहीर होणार आहे. तसेच वसाहत सेवाशुल्क अहवाल १० दिवसात जाहीर होणार आहे.
विशेष म्हणजे यामध्ये मुंबईत – ५,०९० , नाशिक – ९२, औरंगाबाद -१४२, कोकण – ५,३००, अमरावती -१२००, नागपूर – ८९१, पुणे – २०००, एकूण – १४,६२१ असा समावेश असणार आहे.Loading…


Loading…

Loading...