महाआघाडी सरकारच्या विरोधात भाजपाचे मंगळवारी राज्यभर धरणे आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा :  राज्यातील शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडी सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना याचा निषेध भारतीय जनता पार्टीतर्फे मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात येईल व त्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होतील, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आजाद मैदान येथे दुपारी १२ ते ३ या वेळेत धरणे आंदोलन होणार आहे. या आंदोलनात आपण स्वतः सहभागी होणार आहे.

Loading...

ते म्हणाले की, महाआघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन पाळले नाही, वचन दिल्याप्रमाणे अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत दिली नाही आणि फसवी कर्जमाफी जाहीर करून दिशाभूल केली.

या राज्य सरकारने शेतकऱ्यांसह समाजाच्या प्रत्येक घटकाची फसवणूक केली आहे. या सरकारच्या काळात गुन्हेगारांना धाक न उरल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. याच्या विरोधात धरणे आंदोलनाद्वारे राज्यभरात जनजागृती केली जाणार आहे. असेही पाटील म्हणाले.

हेही पहा –

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे