‘भारतामध्ये जे काही घडले ते घृणास्पद’ महिलांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या !

टीम महाराष्ट्र देशा : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी भारतातील महिलांच्या लैंगिक शोषणावर चिंता व्यक्त केली आहे. “भारतामध्ये जे काही घडले ते घृणास्पद आहे. मला आशा आहे की नरेंद्र मोदी सरकार याकडे अधिक लक्ष देईल कारण हे भारतातील स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचे आहे.” अशी आशा देखील त्यांनी त्यांनी व्यक्त केली आहे.

दावोसमध्ये असताना क्रिस्तिना यांनी भारतीय महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा मांडला होता. दावोसच्या भाषणात मोदींनी भारतीय महिलांचा फारसा उल्लेख केला नव्हता. आणि हे क्रिस्तिना यांनी मोदींच्या निदर्शनासही आणून दिलं होतं.