विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोची बलाढ्य जर्मनीवर १-० ने मात

मॉस्को: फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत कालच्या फ गटातील रंगतदार सामन्यात मेक्सिकोने गतविजेता बलाढ्य जर्मनीवर १-o अशी मात केली.हिरविंग लुझानो याने ३५व्या मिनिटाला केलेल्या गोलने मेक्सिकोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे जर्मनीला गेल्या विश्वचषकातही पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

हा सामना लुझियानी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात थॉमस म्युलरने सुरवातीलाच निराशाजनक खेळ केला . सुरवातीला मिळालेल्या संधीचे जर्मनीला गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. मेक्सिकोने जोरदार प्रतिआक्रमण करत गोल केला. ३५ व्या मिनिटाला लुझानो याने जर्मनीचा गोलकिपर मॅन्युअल नेअरने अंत्यंत चपळाईने चकवा देत बॉलला गोलजाळ््यात पाठवले.

लुझानो याच्या कारकिर्दीतील हा आठवा गोल होता. जर्मनीला लुझानोच्या या गोलनंतर लगेचच एका मिनिटात फ्री कीक मिळाली होती. जर्मनीला या संधीचे सोने करता आले नाही. जर्मनीच्या संघाने सामन्यात बरोबरी साधण्याची संधीहि गमावली.

गतविजेत्या जर्मनीच्या संघाने पहिल्या हाफमध्ये जबरदस्त आक्रमक खेळ केला. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर तब्बल १० वेळा हल्ले केले. यावेळी मेक्सिको या सामन्यात मागे पडेल काय असे चित्र निर्माण झाले होते. मेक्सिकोने मोक्याच्यावेळी संधी साधताना चित्र पालटून. सामना आपल्याबाजूने वळविला.