#MeToo : उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार? : शक्ती कपूर

टीम महाराष्ट्र देशा- सध्या बाँलिवुड जगत लैगिंक शोषणाच्या आरोपाने हादरुन गेलंय , बरेच आरोप असे आहेत की यातुन धक्कादायक व्यक्ती समोर आल्या आहेत यामुळे सध्या #MeToo मोहिमेची जोरदार चर्चा आहे.या मोहिमेवर आता बॉलिवूडमध्ये ‘बॅड बॉय’ म्हणून ओळखले जाणारे अभिनेते शक्ती कपूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शक्ती कपूर यांनी या मोहिमेवरच काही प्रश्न उपस्थित केले आहेत. इतकंच नव्हे तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता हस्तक्षेप करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणणं आहे शक्ती कपूर याचं ?
‘#MeTooची बरीच प्रकरणं समोर येत आहेत. अशा प्रकरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक मुली ब्लॅकमेल करत आहेत. त्यामुळे संबंधित व्यक्तीचं नाव जाहीर न करता कोर्टात जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याची बदनामी रोखावी. कलाकार असो, व्यावसायिक असो किंवा नेता असो, कोर्टात आरोप सिद्ध झाल्यावरच त्यांची नावं जाहीर करावी.

आरोपांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. त्यांचं पूर्ण करिअर संपतं. कुटुंबीयसुद्धा त्यांच्याकडे संशयाने पाहू लागतात. नोकरीवरून त्यांना हाकललं जातं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालून याबाबत कायदा करावा. साजिद खान, हृतिक रोशन, अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप केले जात आहेत. साजिदला चित्रपटाच्या दिग्दर्शक पदावरून हटवण्यात आलं. उद्या मोदी साहेब तुमच्यावरही आरोप होतील, तेव्हा तुम्ही काय करणार?

पिंपरी : ‘शिवडे आय एम सॉरी’नंतर आता स्मार्ट बायका कुठे जातात ?