‘शिवसंग्राम ला हव्यात 12 जागा, मात्र युतीचे मित्रपक्षांकडे लक्ष नाही’

Vinayak Mete

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेत जागावाटपा बाबत चर्चा सुरु आहे. मात्र ही चर्चा सुरु असताना युतीच्या दोन्ही मोठ्या पक्षांना मित्र पक्षांचा विसर पडला असल्याच दिसत आहे. त्यामुळे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी आज पुण्यात कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर विनायक मेटे यांनी भाजप सेनेवर नाराजी व्यक्त केली आहे.

विनायक मेटे म्हणाले की, काँग्रेस-राष्ट्रवादी जसे मित्रपक्षांना विश्वासात घेते, तसे भाजप-शिवसेना घेताना दिसत नाही. अगोदर भाजपन घटक पक्षांनबरोबर बोलणं गरजेचे आहे. भाजप घटक पक्ष स्वतंत्र लढले तर, शिवसंग्रामही स्वतंत्र लढेल. मित्रपक्ष भाजप चिन्हावर लढले तर आम्हीही भाजप चिन्हावर लढू. तसेच शिवसंग्रामला युतीकडून १२ जागांची अपेक्षा आहे, असेही मेटे म्हणाले.

दरम्यान विनायक मेटेंचा शिवसंग्राम पक्ष हा गेली पाच वर्ष झालं भाजप सेना युती बरोबर आहे. मात्र या ५ वर्षात विनायक मेटे यांना वगळता पक्षातील एकाही नेत्याला राज्य सरकारच्या महामंडळांवर ठोस स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे शिवसंग्राम पक्षातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्यासाठीचं विनायक मेटे यांनी पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.