औरंगाबादेत ‘मेस्टा’चे राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन, आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

 औरंंगाबाद : इंग्रजी शाळा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी मेस्टाने क्रांती चौकात राज्यव्यापी आत्मक्लेश आंदोलन केले. मात्र, आंदोलनाला परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.

सरकार तर्फे महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळांच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना उदरनिर्वाहा पुरते तरी मानधन द्यावे,महाराष्ट्रातील सर्व इंग्रजी शाळांना सन २०१८ पासून थकित हक्काचे केंद्र सरकारकडून मिळालेले १८५० कोटी रुपये तात्काळ द्यावे.

एक वर्षापासून कोविड १९ च्या कहराने शाळा बंद, विद्यार्थी येणे बंद, शिक्षण मंत्री व अधिकारी यांनी पालकांना फी देण्यापासून रोखले परंतु सगळे टॅक्सेस, बसचे हप्ते, इमारतीचे हप्ते,वीजबिल एक ना दोन सगळ्या खर्चाची सक्तीने वसुली करत आहेत. आज प्रत्येक शाळा संस्था चालक आर्थिक, मानसिक अडचणीत असून याकडे सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला.

यासाठी दि.४ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रातुन १५० निवेदने दिली. तर दि.५ एप्रिलला २०२१ ला संपूर्ण राज्यात २६८ तालुका व जिल्ह्याच्या जि.प. व पं.स.च्या आवारात रुपये ५० कोटीचा आरटिई परताव्याचा शासनाच्या आदेशाची होळीही केली गेली. तरीही सरकारचे लक्ष वेधले जात नसल्याने राज्यभर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आंदोलनाला परवानगी नाही. परंतु मेस्टाने हे आंदोलन केले, त्यांना पोलिसांनी क्रांतीचौकातून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.

महत्त्वाच्या बातम्या