देशात वाहनक्षेत्रात मंदीचं सावट मात्र श्रीमंतांच्या मर्सिडीजची रेकोर्ड ब्रेक विक्री

टीम महारष्ट्र देशा : देशातल्या वाहनक्षेत्रात मंदीचं सावट आहे. पण याच सावटाखाली एका दिवसात तब्बल २०० हुन अधिक आलिशान मर्सिडीज गाड्यांची विक्री झालीय. दसऱ्याच्या मुहुर्तावर मुंबई, गुजरात आणि देशातल्या काही शहरातल्या विक्रीची ही आकडेवारी आहे.

कंपनीनं दिल्याल्या माहितीनुसार फक्त मुंबईतच १२५ हुन अधिक गाड्यांची विक्री झालीय. तर गुजरातमध्ये ७४ गाड्या विकल्या गेल्यात. मर्सिडीज गाड्या या मध्यम वर्गाकडून खरेदी केल्या जात नाहीत, त्यामुळं मंदीचा फटका या कंपनीला बसला नसल्याचंच दिसतंय.

श्रीमंत वर्गाकडून दसऱ्याचा मुहुर्त साधत या गाड्याची खरेदी करण्यात आलीय. त्यामुळं वाहन क्षेत्रातली मंदी आणि या आलिशान गाड्यांची विक्री यात तफावत दिसत असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या