‘अमरावतीची भाकरवडी’ असा उल्लेख करत दिपाली भोसलेंनी नवनीत राणांना डिवचलं!

मुंबई :  शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भोसले या मागील काही दिवसांपासून आपल्या राजकीय वक्तव्यांमुळे चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दिपाली सय्यद भोसले मागील काही दिवसांपासून सातत्याने टीका टिप्पणी करत आहेत. कधी पत्रकार परिषद घेऊन तर कधी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका केली आहे. दिपाली भोसले हे आपल्या सडेतोड बोलण्यामुळे माध्यमाचे लक्ष वेधून घेत आहेत. आता दिपाली भोसले यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना उद्देशून एक ट्वीट केले आहे.

दिपाली भोसले यांनी नवनीत राणा यांचा ‘अमरावतीची भाकरवडी’ असा खोचकपणे उल्लेख केला. दिपाली भोसले आपल्या ट्वीटमध्ये नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधताना म्हंटले आहे की, “मुंबई पोलिसांना हाकलून लावण्याची भाषा केलीस तु तुझ्या घरी.त्याच पोलिसांनी चौकीत खाऊ घातली चाय बटर खारी.मुंबई पोलिसांचे नाव खराब करण्याचा प्रयत्न केलास जरी .आम्ही तक्रार करून उभ करू तुला गृहमंत्र्यांच्या दारी. अमरावतीची भाकरवडी.”

या ट्वीट मध्ये दिपाली भोसले यांनी नवनीत राणा असं हॅशटॅग ही वापरले आहे. यामुळे आता नवनीत राणा आणि दीपाली सय्यद अशा संघर्षाचा नवा अंक निर्माण होण्याची शक्यता आहे. आता नवनीत राणांकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या :