Mental Health | मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mental Health | टीम कृषीनामा: आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्यस्त जीवनशैली, तणाव, कामाचा दबाव आणि सामाजिक आव्हानांमुळे मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो. आजच्या युगात अनियमित जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे प्रत्येक दुसरी व्यक्ती मानसिक आरोग्याच्या समस्यांना झुंज देत आहे. मानसिक ताण आणि तणाव इत्यादी गोष्टींचा परिणाम थेट तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. तुम्ही मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर त्याचा परिणाम थेट तुमच्या शारीरिक आरोग्यावर होऊ शकतो. त्यामुळे मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहणे खूप महत्त्वाचे आहे. मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी तुम्ही पुढील टिप्स फॉलो करू शकतात.

व्यवस्थित झोप घ्या (Get proper sleep-For Mental Health)

मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि तणाव दूर करण्यासाठी व्यवस्थित झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे मानसिकदृष्ट्या निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दररोज आठ तास झोप घेणे अनिवार्य आहे. व्यवस्थित झोप झाल्यावर तुम्ही दिवसभर ताजे आणि सकारात्मक राहू शकतात.

मेडिटेशन करा (Do meditation-For Mental Health)

मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी दररोज ध्यान आणि योगासने करणे खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज मेडिटेशन केल्याने मन शांत आणि सकारात्मक राहते. त्याचबरोबर नियमित ध्यान केल्याने शारीरिक आरोग्य देखील चांगले राहू शकते.

पोषक आहाराचे सेवन करा (Consume nutritious food-For Mental Health)

नैराश्य, तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी पोषक आहाराचे सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पोषक आहाराचे सेवन केल्याने तुम्ही अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकतात. निरोगी आहाराचे सेवन केल्याने मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात ताजी फळे, हिरव्या भाज्या इत्यादींचा समावेश करू शकतात.

मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी तुम्ही वरील उपाय करू शकतात. त्याचबरोबर घबराट आणि अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही पुढील पदार्थांचे सेवन करू शकतात.

डार्क चॉकलेट (Eat Dark Chocolate in Nervousness)

बहुतांश लोकांना चॉकलेट खायला आवडते. घबराट आणि अस्वस्थता जाणवत असल्यास तुम्ही डार्क चॉकलेटचे सेवन करू शकतात. डार्क चॉकलेट खाल्ल्याने चिडचिड, तणाव आणि अस्वस्थता दूर होण्यास मदत होते. डाग चॉकलेटमध्ये आढळणारे गुणधर्म अस्वस्थता सहज दूर करतात. त्यामुळे तुम्हाला जर अस्वस्थ वाटत असेल, तर तुम्ही कमी प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन करू शकतात.

हळद (Eat Turmeric in Nervousness)

हळद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हळदीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट आणि अँटिइप्लिमेंटरी गुणधर्म अस्वस्थता आणि चिंता सहज दूर करतात. त्याचबरोबर हळदीचे सेवन केल्याने शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. त्यामुळे हळदीचे सेवन करणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

लिंबू (Eat Lemon in Nervousness)

लिंबू आपल्या शरीरातील अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. लिंबामध्ये आढळणारे गुणधर्म पोट निरोगी ठेवतात. त्याचबरोबर मूड खराब असल्यास तुम्ही लिंबाचे सेवन करू शकतात. तणाव आणि अस्वस्थता जाणवत असल्यास तुम्ही लिंबू पाण्याचे सेवन करू शकतात. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने तुमचा मूड फ्रेश होऊ शकतो. त्याचबरोबर याच्या सेवनाने शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Nose Redness | नाकाच्या आजूबाजूची त्वचा लाल होत असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Mahashivratri 2023 | महाशिवरात्रीला उपवास करणार असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Potato Juice | चेहऱ्यावरील चमक वाढवण्यासाठी बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Weight Loss | शरीरातील अतिरिक्त चरबी पासून सुटका मिळवण्यासाठी जिरा पाण्याचे ‘या’ पद्धतीने करा सेवन

Acidity | ऍसिडिटी झाल्यावर लवंगाचे ‘या’ पद्धतीने करा सेवन