fbpx

पुरुषांनाही पालकत्व रजा मिळणार

वेबटीम : ज्याप्रमाणे प्रसूतीनंतर महिलांना प्रसूती रजा दिली जाते त्याप्रमाणे राज्य सरकारच्या सेवेतील पुरुष कर्मचाऱ्यांना पॅटर्निटी लिव्ह देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. तशी बाब राज्य सरकारच्या विचाराधीन असून याबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात दिली आहे.
आमदार कपिल पाटील यांनी राज्य सरकारच्या सेवेतील व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिला कर्मचारी व अधिकारी तसेच अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना बालसंगोपनासाठी दोन वर्षांपर्यंत केंद्राप्रमाणे भरपगारी रजा द्यावी अशी मागणी त्यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. तसेच पुरुष कर्मचाऱयांना पॅटर्निटी लिव्ह देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन आहे का, असाही सवाल त्यांनी केला होता.